Nana Patole News SaamTv
Video

Congress : भाईंदरमध्ये काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन

Rahul Gandhi : आमदार संजय गायकवाड आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

Saam Tv

राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने भाजप विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. भाईंदरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणसंदर्भातील वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यानंतर बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी काँग्रेसने राज्यभरात सर्वत्र भाजप विरोधात जोडे मारो आंदोलन सुरू केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील भाईंदरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पाटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून भाजपचा निषेध करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

SCROLL FOR NEXT