Mumbai Congress Protest at ED Office SAAM TV
Video

Congress Protest : ED कार्यालयाबाहेर काँग्रेसचा मोर्चा, अदानींनी घोटाळा केल्याचा आरोप, चौकशीची मागणी, पाहा VIDEO

Mumbai Congress Protest at ED office : मुंबई काँग्रेसने ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी मोर्चा रोखला. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. अदानी समूहाने घोटाळा केल्याचा आरोप करतानाच खासदार वर्षा गायकवाड यांनी चौकशीची मागणी केली.

Saam Tv

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. अदानी समूहानं शेअर, रिअल इस्टेट क्षेत्रात घोटाळा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मोर्चाद्वारे केली.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. ईडीच्या कार्यालयाजवळच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. ईडी कार्यालयाजवळ पोहोचण्याआधीच वर्षा गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. अदानी समूहानं घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. या घोटाळ्यांची चौकशी करण्याची जबाबदारी ईडीची आहे. चौकशीची मागणी करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? आम्हाला रोखण्यात येतं, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असंही त्या म्हणाल्या. आम्हाला का जाऊ देत नाहीत, असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

Pune crime : पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ, गुन्हेगारी जगतातलं भयान वास्तव, पाहा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT