अक्कलकोट तालुक्यात आंदेवाडी गावात रेशनच्या तांदुळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा गंभीर आरोप सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिकचे तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप करत सॅम्पल देखील दाखवले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावामध्ये अशा प्रकारचा तांदुळ विकल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तसेच यावेळी प्लॅस्टिकच्या तांदळाचे पॅकिंगही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. रेशन दुकानात गरिबांना धान्य मिळत नाहीये, असं म्हणत यावेळी प्रणिती शिंदेंनी संताप व्यक्त केला. प्रणिती शिंदे यांच्या या दाव्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना संदर्भात विचारलं असता हे तांदूळ प्लास्टिकचे नसून फोर्टिफाईड असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.