धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्या, मगच चर्चा करू, असा पवित्रा राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला आहे.  saam tv
Video

आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मगच चर्चा; काँग्रेस ठाम, थेट राज्यसभेत मागणी, VIDEO

congress demands dharmendra pradhan resignation : नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी आक्रमक झालेल्या काँग्रेसने या मुद्द्यावर भाजप सरकारला संसदेत घेरलं आहे. आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मगच चर्चा, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.

Nandkumar Joshi

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, मगच आम्ही चर्चा करू, असे ते म्हणाले. यावर NEET बाबत आम्ही चर्चेला तयार असल्याचं जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांनी लाठीमार केला. या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडला. बराच वेळ आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदार आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या आंदोलनाचे पडसाद देशभरातील विविध राज्यांत उमटले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, संसद अधिवेशनातही भाजप सरकारला घेरलं आहे. आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, मगच आम्ही चर्चा करू, असं खरगे म्हणाले. त्यावर नीट परीक्षेबाबत आम्ही चर्चेला तयार आहोत, असे सरकारच्या वतीने जेपी नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे उपरोधिक आंदोलन

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

SCROLL FOR NEXT