Congress MP Praniti Shinde expressing anger at Solapur municipal officials during a review meeting. Saam Tv
Video

खासदार प्रणिती शिंदे यांचं रौद्ररूप; विकासकामांवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर|VIDEO

₹40 Crore MP Fund at Stake: सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना विकासकामांच्या संदर्भात चांगलेच सुनावले.

Omkar Sonawane

सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आज महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. विकासकामांच्या संदर्भात घेतलेल्या बैठकीत शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून कामांचा तपशील मागवला. खासदार निधीतून तब्बल ४० कोटी रुपये विकासकामांसाठी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मात्र, या कामांचा लेखाजोखा मागितल्यानंतर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्या चांगल्याच भडकल्या होत्या. शिंदे यांच्यासह उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील भाजप आमदारांच्या कामांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, सोलापुरात झालेल्या पावसामुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. यामुळे शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी महापालिकेच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने पुन्हा गेवराईच्या शिंगरवाडीत थोपटले दंड.

Kangana Ranaut : कंगना रनौतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, नेमकं काय आहे प्रकरण?

Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या हंगामी पंतप्रधान; रात्रीच घेणार शपथ, हालचालींना वेग

Uddhav Thackeray: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामना? उद्धव ठाकरेंचा संताप, जिल्हाप्रमुखांना दिल्या 'या' सूचना|VIDEO

Saturday Horoscope : राग राग न करता शांत राहून कामे करावी लागणार; ५ राशींच्या लोकांची चिडचिड वाढणार

SCROLL FOR NEXT