लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची लूट? नेमकं प्रकरण काय? Saam Tv
Video

Special Report: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची लूट? नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी तलाठी कार्यालये, सेतू सेवा केंद्रावर झुंबड उडाली आहे. मात्र दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक लूट सुरु आहे. दुसरीकडे योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विरोधकांकडून होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य प्रदेशात लाडली बहन योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. त्याचीच पुनरावृत्ती करत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातल्या सेतू केंद्रांवर महिलांची मोठी झुंबड उडालीय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत १५ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रांसमोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्याचाच फायदा उचलत आता दलालांनी या लाडक्या बहिणींना लुटण्याचा सपाटा लावलाय...सोलापुरात या लाभार्थी महिलांकडून ३०० ते ४०० रूपये उकळले जातायत. तर कोल्हापुरात तासंतास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे महिला वैतागल्या आहेत. आणि त्यामुळेच योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Pain Exercises: गौरी-गणपतीच्या धावपळीमुळे कंबर दुखतेय? 'हे' ५ सोपे उपाय देतील झटपट आराम

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल खून प्रकरणी ५ हजार ५३ पानी दोषारोपपत्र दाखल

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत विसर्जनाला गालबोट, विजेचा धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune FDA : पुण्यात रात्रीच्या अंधारात महामार्गावर थरार! १ कोटींचा गुटख्याचा ट्रक पकडला; FDA ची सर्वात मोठी कारवाई

Eye Health : चष्मा कायमचा निघेल! रोज रात्री झोपण्यापूर्वी 'ही' एक गोष्ट खा

SCROLL FOR NEXT