CM Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा ! कामाख्या देवीचं सहकुटुंब दर्शन | Video

CM Eknath Shinde In Guvahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी येथे गेले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांषी देखील संवाद साधला.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे सहकुटुंब कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. हा त्यांचा गुवाहाटीचा तिसरा दौरा असून अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडताना देखील एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत गेल्यावर कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.

महायुतीतील जागावाटपात भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते आज गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत.

दरम्यान, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, आम्ही कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi R

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार गटाला सर्वात मोठं खिंडार, हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; कारण काय?

SCROLL FOR NEXT