Maharashtra CM on Loan Waiver Demand Saam TV Marathi News
Video

Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार का? कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

Maharashtra CM on Loan Waiver Demand : नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन छेडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलं नाही. सरकार सकारात्मक आहे आणि चर्चेस तयार आहे.”

Namdeo Kumbhar

CM Fadnavis on Bachchu Kadu’s Farmers’ Protest : नागपूरमध्ये माजी आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाएल्गार आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. रस्तारोको, रेल रोको करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने पहिल्या दिवसापासून या प्रश्नावर सकारात्मक भूमिका ठेवली आहे. आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये. आमची चर्चेची तयार आहे.

कर्जमाफीसाठी आम्ही कमिटी तयारी केली. शेतकरी अडचणीत आहे, त्यांना मदत करण्याचे आम्ही प्रयत्न करतो. आपण कर्जमाफी करतो, त्यावेळी ती बँकेत जाते. पहिल्यांदा मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली पाहिजे. आम्ही कर्जमाफी करणार नाही, असे म्हणालोच नाही. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जायला हवेत, ते महत्त्वाचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारने पहिल्या दिवसापासून याबाबत सकारात्मक भूमिका ठेवली आहे. आंदोलनच्या आधीही आम्ही बैठक बोलवली होती. आपण चर्चा करून यातील ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू. बच्चू कडू यांनी पहिल्यांदा याला मान्यता दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्रीत मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही. यामुळे अडचण होऊ शकते. त्यामुळे आम्ही बैठकीला येऊ शकत नाही. मग आम्ही ती बैठक रद्द केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Picnic Spot : निसर्ग, संस्कृती अन् चहाच्या सुगंधाने बहरलेले शहर, 'येथे' पाहाल सुंदर नजारा, आताच ट्रिप प्लान करा

Horoscope Tuesday: मनासारखा जोडीदार मिळणार; 5 राशींचे निर्णय ठरतील अयशस्वी, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Mumbai Building Fire : मुंबईत ७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT