Devendra Fadnavis  saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले... VIDEO

No Misuse of Tribal Funds: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणी दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी इतर योजनेचा पैसा वळवण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मागच्या महिन्यात देखील सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवल्याचा आरोप खुद्द सामाजिक मंत्री संजय शिसाठ यांनी केला होता. आता पुन्हा लाडक्या बहीणींसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. यावरून विरोधक हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. फडणवीस हे आज परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जो काही आरोप आहे, तो साफ खोटा आहे. अतिशय चुकीचा आहे. अर्थसंकल्प ज्यांना समजत नाही अशी मंडळीच आसा आरोप करू शकतात. नियम असा आहे की, आपल्या अर्थसंकल्पनेत आदिवासी लोकसंख्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येप्रमाणे निधी राखीव ठेवावा लागतो.

हा निधी राखून ठेवताना त्यातील जास्तीत जास्त निधी हा व्यक्तिक लाभाच्या योजनेसाठी राखीव ठेवला पाहिजे आणि काही निधी विशेष विकासकामांसाठी ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे. ज्यांना हे कळत नसेल त्यांनी माझ्याकडे यावे, अजित पवारांनी योग्य काम केले आहे असे ही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

SCROLL FOR NEXT