Ajit Pawar News Update  Saam tv
Video

Ajit Pawar : अजित'दादां'च्या निधनामुळे मुख्यमंत्री शोकमग्न, जिल्हा परिषदेचा प्रचार थांबवला

Devendra Fadnavis cancels ZP election campaign : अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Namdeo Kumbhar

Zilla Parishad elections Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. आपल्या एका जवळच्या सहकाऱ्याला गमावल्याचे दुःख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरून स्पष्टपणे दिसत आहे. अजित दादांना आदरांजली म्हणून मुख्यमंत्र्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आपल्या सर्वच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस पुढील 7 दिवसांत 22 प्रचारसभा घेणार होते. पुढील काही दिवसांत राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ७ दिवसांत २२ भव्य प्रचारसभा घेणार होते. ५ फेब्रुवारीपर्यंत प्रचाराची रणधुमाळी चालणार होती मात्र, काळाने अजित दादांना आपल्यातून हिरावून नेल्यामुळे, अशा परिस्थितीत राजकारण आणि सभा घेणे मुख्यमंत्र्यांना योग्य वाटले नाही. त्यांनी तत्काळ आपल्या सर्व सभांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, एक संवेदनशील सहकारी म्हणून त्यांनी दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षण देण्याची एजन्सी चालकांची मागणी

Friday Horoscope: आजच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, वाचा आजचं राशीभविष्य

Iran-US War: आखातातील युद्ध थांबणार? इराणच्या 3 अटी अमेरिकेला मान्य?

Friday Horoscope : प्रमोशन ते प्रेमापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण होणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

SCROLL FOR NEXT