amboli ghat waterfall Video SAAM TV
Video

VIDEO : आंबोली घाटात पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी, काही पर्यटक जंगलात पळाले!

Amboli Ghat Waterfall : आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटकांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.

Nandkumar Joshi

सिंधुदुर्गातील आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावरील ही दृश्ये आहेत. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. वाहने पार्किंग करण्यावरून हा वाद झाला. वाद टोकाला जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला. आंबोली पोलिसांनी गडहिंग्लज आणि सावंतवाडी येथून आलेल्या या पर्यटकांच्या गटातील २९ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

गडहिंग्लज आणि सावंतवाडीतून दोन गट वर्षासहलीसाठी आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर आले होते. धबधब्याजवळ रस्त्यानजीक वाहने उभी करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला गेला. त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. पोलीस येताच काही पर्यटकांनी जंगलामध्ये धूम ठोकली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून रात्री दोन्ही गटांतील पर्यटकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लव्ह स्टोरीचा भयंकर अंत! तरुणाची निर्घृण हत्या; मुलीचा बाप अन् भाऊ हाती लागला अन् गूढ उकललं

Maharashtra Live News Update: नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

SCROLL FOR NEXT