मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि देशातील इतर विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत अभुतपूर्व सुरक्षा बंदबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारल्याने पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनासाठी अनेक राज्यातील माजी मुख्यमंत्री देखील सामील झाले आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निदर्शने करत असतानाच पोलिस आणि CRPF जवानांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस व्हॅनमध्ये बसवले. तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जंतर-मंतरला जाण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.