chief justice bhushan gavai latest News Saam tv
Video

Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई संतापले, भर कार्यक्रमात काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

chief justice bhushan gavai latest speech : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भरकार्यक्रमात संताप व्यक्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली.

Vishal Gangurde

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई हे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदा चैत्यभूमीवर आले. चैत्यभूमीवर येण्याआधी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे सत्कार करण्यात आला. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सत्कार कार्यक्रमात राज्यातील तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची गैरहजेरी पाहायला मिळाली. यावरून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर तिन्ही अधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर पोलीस महासंचालक डी जी रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आणि राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर उपस्थित झाले. त्यांच्यासहित इतर अधिकारीही हजर झाले. चैत्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी प्रतिक्रिया दिली. 'जे झालं, ते मी कळवलं आहे. माझी प्रोटोकॉलबाबत कोणतीही नाराजी नाही', अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश गवई यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT