Chhagan Bhujbal News SaamTv
Video

Chhagan Bhujbal : 'वाकीफ कहां जमाना हमारी उडान से..', शायरीतून भुजबाळांचा निशाणा कोणावर?

Naygaon Program : नायगाव येथे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी चांगलीच शेरो शायरी केलेली बघायला मिळाली.

Saam Tv

वाकीफ कहा जमाना हमारी उडान से, वो हार गये जो डरे आसमान से, अशी शेरो शायरी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नायगाव येथील कार्यक्रमात केली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज नायगावमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेते छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, मकरंद पाटील, शिवेंद्र भोसले, शंभूराजे देसाई, अदिती तटकरे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणातून भुजबळ यांनी चांगलीच शेरो शायरी केलेली दिसली.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, हरी नरके इथे मला घेऊन आले आणि सांगितले की या पडक्या वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यानंतर इथे स्मारक उभारायचे आम्ही ठरवले. मी त्यावेळी विधानपरिषदेचा आमदार होतो. तो निधी इथे वापरायचे ठरवले. सावित्रीबाईंना शेणाचे गोळे तुम्ही आणि सगळ्यांनी मारले, फक्त ब्राम्हणांनी नाही. फुल्यांना काही ब्राम्हणांनी जसा विरोध केला तसा काहींनी मदतही केली. ज्या वाड्यात पहिली शाळा सुरु झाली ते भिडे ब्राम्हणच. फुलेंचा विरोध ब्राम्हणाला होता. ब्राम्हणांना नव्हता. देवेंद्रजी तुम्ही सावित्रीबाईंचे काम पुढे नेत आहात म्हणून तुमचे धन्यवाद. विधीमंडळाच्या सभागृहाच्या समोर फुलेंची प्रतिमा लावण्याचे , महाज्योतीच्या माध्यमातुन शिष्यवृत्ती देण्याचे काम तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी केले. भिडे वाड्याचे काम सुरु झालंय मात्र कामाला धक्का देण्याची गरज असल्याचं सांगत सावित्रीबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पुन्हा सुरु व्हावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT