Police security increased at Chhagan Bhujbal’s Nashik residence after opposing Maratha quota GR Saam Tv
Video

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या GR ला विरोध; भुजबळांच्या नाशिक निवासस्थानी सुरक्षेत वाढ|VIDEO

OBC Leader Chhagan Bhujbal Boycotts Cabinet: मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशाला विरोध केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर भुजबळांचा तीव्र विरोध.

मंत्रिमंडळ आणि स्नेहभोजन कार्यक्रमावर बहिष्कार.

कोर्टात जाण्याची भुजबळांची भूमिका.

नाशिक निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवली.

मराठा समाजाला ओबीसीमधून म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झालेय. काल मंत्री मंडळाच्या बैठकीवर देखील भुजबळ यांनी बहिष्कार टाकला होता. यानंतर त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवत या जीआरच्या विरोधात हायकोर्टात आणि वेळ पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊ अशी भूमिका भुजबळ घेतली आहे.

तसेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावर देखील भुजबळांनी बहिष्कार टाकला होता. एकदरीतच भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर विरोध केल्याने आता त्यांच्या नाशिक येथील निवासस्थानी पोलिस सुरक्षा वाढवली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना अतिरिक्त सुरक्षा दिल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT