Ratnagiri - Mumbai sAAM tv
Video

Ratnagiri Mumbai Highway : रत्नागिरी - मुंबई महामार्गावर ट्रकला भीषण आग | VIDEO

Truck Fire : रत्नागिरी-मुंबई महामार्गावर एका ट्रकला अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार ट्रकमधील केमिकलमुळे ही आग भडकली. या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी परिसरात केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक भीषण आग लागली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला हा टँकर महामार्गावर जात असताना अचानक त्याच्या चाकांखालून धुर निघू लागला आणि काही क्षणांत संपूर्ण टँकरने पेट घेतला.टँकरमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनामुळे आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. इतकेच नव्हे, तर टँकरच्या चाकांनीही पेट घेतल्याने संपूर्ण वाहन काही मिनिटांत जळून खाक झाले आहे.

घटनेनंतरही अग्निशमन दलाची किंवा आपत्कालीन यंत्रणांची टीम घटनास्थळी दाखल झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनीच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्पुरती थांबवत सुरक्षेच्या दृष्टीने पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला आहे.या दुर्घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT