Chandrashekhar Bawankule responds sharply to Nana Patole’s controversial remark during the Gondia election rally. Saam Tv
Video

Maharashtra Politics: नाना पटोलेंना महागात पडणार, 'त्या' टीकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Political Impact Of Nana Patole: नाना पटोले यांच्या ‘बापाचा’ उल्लेखावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार करत इशारा दिला आहे. काँग्रेसला याचा फटका बसणार असून निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा दावा त्यांनी केला.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कॉँग्रेसनेते नाना पटोले आणि भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यात चांगलींच जुंपली आहे. गोंदिया येथे झालेल्या सभेदरम्यान बावनकुळे यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून नाना पटोले यांनी जोरदार टीका केली होती. तेरे बाप का राज है क्या' जमिनीचे पट्टे काय तुमच्या बापाच्या मालकीचे आहेत का? पट्टे देण्यासाठी भाजपला मत द्यावे लागेल असे म्हणताय? हे काही 'तेरे बाप का राज' नाही अशी घणाघाती टीका केल्यानंतर आता बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. नाना पटोले यांनी माझ्या वडिलांचा, बापाचा उल्लेख केला आहे.

नाना पटोलेची हीच पातळी पहिल्यापासून राहिली आहे. त्यांनी पातळी सोडूनच राजकारण केलं आहे. माझ्या बापाचा-माझ्या वडिलांचा उल्लेख करून जर नाना पटोले निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांना महागात पडणार आहे. जनता त्यांना धडा शिकवेल, शेवटी कोणाच्याही वडिलांचा- बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाही त्यांनी आमच्या परिवाराचा अपमान केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांगतो असे जोरदार प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत महायुती होणार?

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Shilpa Shinde Comeback: शिल्पा शिंदे परतली? 'भाभी जी घर पर है' शोमध्ये दिसणार खरी 'अंगुरी भाभी'

SCROLL FOR NEXT