chandrapur news  Saam Tv
Video

Chandrapur News: नोटा दिल्या नाही म्हणून गाडीतून पेट्रोल काढले

Viral Video: चंद्रपूर शहरातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

चंद्रपूर शहरातील ताडोबा मार्गावरील बियाणी पेट्रोल पंपावरील ही घटना आहे. पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने १० रुपयाचे ९ शिक्के दिले. मात्र, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याने शिक्के स्वीकारण्यास नकार दिला आणि "आमच्या पंपावर नाणी चालत नाहीत, फक्त रोकडच स्वीकारली जाते," असे सांगितले.

ग्राहकाकडे नोटा नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पंप व्यवस्थापनाच्या या अटीतटी घालणारी वृत्तीच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, देशातील कोणतेही वैध नाणे किंवा नोटा स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, बियाणी पेट्रोल पंपावर हा नियम पाळला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची आणि संबंधित पंप बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

SCROLL FOR NEXT