Pandharpur Chandrabhaga River Saam TV
Video

Chandrabhaga River Water Level : चंद्रभागेच्या पाणीपातळीत मोठी वाढ, आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांना धोका | VIDEO

Pandharpur Chandrabhaga River Flood Alert : चंद्रपुरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आषाढी वारीच्या तोंडावर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर-उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विर्सग करण्यात आल्यामुळे पंढरपूरातील चंद्रभागा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. उजनी धरणातून भीमा आणि निरा नदीत ५० हजार क्युसेक, तर वीर धरणातून ३० हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. या अचानक वाढलेल्या विर्सगामुळे चंद्रभागा वाळवंट परिसर पूर्णपणे जलमय झाला असून, भक्त पुंडलिक मंदिरासह इतर अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. आषाढी वारीच्या तोंडावर ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

घाटावर आलेल्या वारकऱ्यांकडून धोकादायक पद्धतीने स्नान केलं जात आहे. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठावर रेस्क्यू टीम तैनात केल्या आहेत. प्रवासी आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आवर्जून सांगण्यात येत आहे, जेणेकरून आषाढी वारी शांततेत पार पडू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई ३ दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

Kalyan : हप्ते वसुली, दरोडा अन् मारहाण; मराठी तरुणीला मारणाऱ्या परप्रांतीय गोकुळचा कच्चाचिठ्ठा उघड

Sawan Budhwar Upay : श्रावणातील बुधवारी करा 'हे' सोपे उपाय; गणपती बाप्पा सोबत शंकराचाही मिळेळ आशीर्वाद

Kasara : कसारा स्थानकात लोकलवर दरड कोसळली, 2 प्रवासी गंभीर जखमी | VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! निवडणुकांनंतर अर्जांची पडताळणी होणार

SCROLL FOR NEXT