कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्कात निम्म्याने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. आजपासून हा निर्णय लागू करण्यात होणार आहे.
लोकसभेला महायुतीला याच कांद्याने रडवलं होतं. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातीवरील बंधनं कमी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क ४० ऐवजी आता २० टक्के करण्यात आला आहे. काल केंद्राने कांदा निर्यातीवरील ५५० डॉलर निर्यात मूल्य हटवल्यानंतर आजपासून निर्यात शुल्कात देखील कपात करण्यात आली आहे. यामुळे कांदा निर्यातीत वाढ होण्यास मदत होणार आहे. निर्यतीवरील बंधनं कमी केल्याने आगामी काळात कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.