HMPV virus outbreak google
Video

HMPV Virus : चीनमध्ये थैमान, भारतात सावधगिरी; सरकारने नागरिकांना काय सूचना केल्या आहेत? वाचा

hmpv virus : चीनमधून कोरोना सदृश्य नव्या HMPV विषाणूने थैमान घातलं असताना भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय.. तर HMPV ला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने खबरदारीचे उपाय योजलेत. काय आहेत हे नव्या व्हायरसला रोखण्याचे उपाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

जग कोरोना महामारीच्या संकटातून पूर्णपणे सावरत नाही तोवर चीनमध्ये पुन्हा नव्या व्हायरसने थैमान घातलंय.. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय.. पाच वर्षांपूर्वी कोरोनानं भारतात केरळमधून एन्ट्री केली होती. त्यानंतर तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता केरळ आणि तेलंगणातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत...या सूचना काय आहेत? पाहूयात...

कोरोना आला, सरकार अलर्टवर

खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरा

वारंवार हात साबणाने धुवा आणि सॅनिटायझरचा वापर करा

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि फ्लूमुळे आजारी लोकांपासून अंतर राखा

ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा

पुरेसं पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या

आजारी असताना घरी रहा, इतरांशी संपर्क टाळा

भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही अपडेट मागवल्या आहेत. एवढंच नाही तर भारत सरकारने केरळ आणि तेलंगणातील नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना दिल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलंय.

चीनमध्ये HMPV चे रुग्ण आढळून येत असल्याचं वृत्त चीनने फेटाळलंय.. तर प्रत्येक हिवाळ्यात फ्लू चे रुग्ण वाढत असल्याचा दावा केलाय. मात्र चीनने कोरोना महामारीच्या काळातही अशाच पद्धतीने कोरोनाबाबतचा दावा फेटाळला होता... त्यामुळे चीन दावा फेटाळत असला तरी भारतातील नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT