CBI officials arrive in Nashik as investigation into the NEET paper leak case intensifies. saam tv
Video

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Neet Paper Leak Cbi Team Reaches Nashik Accused Detained: NEET पेपर लीक प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर CBI पथक शहरात दाखल झाले आहे. शुभम खैरणारला ताब्यात घेत दिल्लीला नेण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Omkar Sonawane

NEET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर या प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले. या प्रकरणी दुपारी नाशिक पोलिसांनी शुभम खैरनार या व्यक्तीला शहरातील इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. हे संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शुभम खैरनारचा ताबा नाशिक पोलिसांकडून घेऊन त्याला दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

३ मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेत तयारी केली होती. परीक्षा पार पडल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले. तर काही जण पालकांसोबत परदेश दौऱ्यावरही गेले आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT