Dhule Saam TV
Video

Mumbai - Agra : मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या बसला भीषण आग! | VIDEO

Dhule Bus Fire : मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या बसला भीषण आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धुळे तालुक्यातील देवभाने परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. इंदोरकडे जाणारी खाजगी बस अचानक भररस्त्यात पेटली. सुरुवातीला बसच्या टायरला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT