Buldhana Policeman Beaten by In Laws Saam Tv
Video

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

Buldhana Policeman Beaten by In Laws: बुलडाण्यामध्ये पोलिसाला सासू-सासऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

बुलडाण्यात पोलिस कर्मचाऱ्याला सासू -सासऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी जावयाच्या घरी जाऊन मारहाण केली. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली.

बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याला सासू सासऱ्यांनी घरी जाऊन मारहाण केली. मारहाण झालेल्या निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रभू चाटे असून मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ४ महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती.

दरम्यान पोलिस कर्मचारी प्रभू चाटेवर गुन्हा देखील झाला होता. प्रभू चाटे मुंबईवरून घरी आल्याचे समजताच सासू-सासऱ्यांनी त्याचे घर गाठले. घरात घुसून त्यांनी प्रभू चाटेला खेचून बाहेर आणलं आणि बेदम मारहाण केली. या प्रकरणी अंधेरा पोलिस ठाण्यात सासू- सासऱ्यासह मेहुण्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT