Buldhana News Saam Tv
Video

VIDEO: ग्रामस्थांना आरेरावी करणाऱ्या तलाठ्याची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

Buldhana Talathi Video: बुलडाण्याच्या खेर्डा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यावेळी तलाठ्याने ग्रामस्थांना आरेरावी केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Priya More

बुलडाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलडाण्यामध्ये ग्रामस्थांसोबत आरेरावी करणाऱ्या तलाठ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली. बुलडाण्याच्या खेर्डा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यावेळी तलाठ्याने ग्रामस्थांना आरेरावी केली होती. लाडकी बहीण या योजनेसाठी बुलडाण्यामध्ये तलाठी कार्यालयामध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी तलाठ्याने महिलांवर आरेरावी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यांनी या तलाठ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता या तलाठ्याविरोधात नेमकी काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT