buffalo gaur hybrid 
Video

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

buffalo gives birth to gaur hybrid calf in Pune : पुण्यातल्या रायरेश्वर मंदिराजवळ माळवाडी गावात एका म्हशीला रानगव्याचं रेडकू झालं आहे. या अनोख्या रेडकूमुळे गावात चर्चा रंगली असून वन विभागाने विशेष लक्ष ठेवले आहे.

Namdeo Kumbhar

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही. आणि कधी केव्हा आश्चर्याचा धक्का बसेल याचा काही नेम नाही. पुण्यातल्या रायरेश्वर जवळ एका गावात एका म्हशीला रेडकू झालं.. पण रेडकू झाल्यानंतर भलतीच चर्चा रंगलीय.. नेमकं काय घडलंय..चला पाहूया...

रायरेश्वर मंदिराच्या जवळ माळवाडी म्हणून आहे गाव. त्या गावात घडलंय अकरीत. येतं झालय म्हशीला रेडकू.... आता तुम्ही म्हणाल रेडकू झालं यात आकरीत काय? रेडकू साध सुधं नाय... गोरपाण अन् दणकेबाज हाय.. ? रेडकू जन्मलं अन् मालक वाघमारे ना डोक्यालाच हात लावला.. म्हणला काय तर गडबड घोटाळा झालाय...

वाघमारे साहेबांनी थेट वन अधिकाऱ्यांना संपर्क केला. अन् रेडकूची माहिती दिली. रेडकू साधं दिसना ... डोक्याची रचना रानगव्यावानी अन् अंगकाठी मजबूत... रंग गोरापान.. वनअधिकारी म्हणलं ही रानगव्याचं क्रॉस दिसतंय.

म्हस तशी गरीब गुणाची... रोज रानात चरायची गुंराख्याच्या नजर चुकीनं झाला घोळ. आता फॉरेस्टचं साहेब रेडकूवर बारकी नजर ठेवून हायई... अन् गावातल्या माणसांना काळजी घेण्याच्या दिल्यात सूचना...

आता झालं ती झालं सध्या गावात ही रेडकू झालाय पोस्टर बॉय... मालक बी हारकू रेडकू दावतू. पण खारं सांगायचं तर काळची घेतलेली बरी नायतर रेडकू मोठं झाल्यावर व्हायचं लाखाचं १२ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT