igatpuri news  saam tv
Video

Nashik News: पोलिसांवर जीवघेणा हल्ला; संतप्त जमावाने डोक्यावर फोडल्या काचेच्या बाटल्या, VIDEO

Brutal Assault on Igatpuri Police : नाशिकच्या इगतपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, यामध्ये चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने पोलिसांचे कपडे फाडले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने हल्ला केला. या मारहाणीत इगतपुरी पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडण्यात आले. पोलिसांवर झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या चौकशीदरम्यान हल्ला झाला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी सदर मृत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर परिसरातील आदिवासी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर पोलिस चौकशीसाठी गेले असता जमावाने थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. जमावाने पोलिसांच्या डोक्यात काचेच्या बॉटल फोडल्या यामुळे पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT