Arab parties support Gadi Eisenkot for Israeli Prime Minister Saam tv
Video

Political News : इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ; नेतन्याहूंची सत्ता धोक्यात!

Benjamin Netanyahu Political News : इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ! गादी आइसेनकोट यांना 67 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. बेंजामिन नेतन्याहूंची सत्ता जाणार का? जाणून घ्या संपूर्ण घडामोडी.

Alisha Khedekar

इस्त्रायलच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर आता सत्तेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अरब पक्षांनी यशार पार्टीचे नेते गादी आइसेनकोट यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. या पाठिंब्यामुळे आइसेनकोट यांच्या बाजूने आमदारांची संख्या वाढली असून, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा त्यांनी गाठल्याचा दावा केला जात आहे.

आता या राजकीय घडामोडींमध्ये इस्त्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी गादी आइसेनकोट यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती याबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जर आइसेनकोट यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली, तर इस्त्रायलच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. तसेच बेंजामिन नेतन्याहू यांना पंतप्रधानपद सोडावे लागू शकते. आता या सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार आणि इस्त्रायलची सत्ता कोणाच्या हातात जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:मुंबई हायकोर्टाला धमकीचा मेल

Health Tips: सतत हात-पाय थंड पडतात? शरीरातील 'या' ७ समस्या असू शकतात कारणीभूत!

Kitchen Vastu Tips: गॅस आणि सिंक एकाच ओट्यावर असणं अशुभ? वाचा वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो, उपायही जाणून घ्या

Dhanteras Gold Price : २०१५ मध्ये २५ हजार तोळा, यंदा किती किंमत! वाचा १० वर्षांत सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली?

Sharad Pawar : प्रफुल पटेलांनी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT