Sambhajinagar  
Video

भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक! संभाजीनगरमध्ये माजी मंत्र्यांची कार रोखली, काळे फासले, पाहा व्हिडिओ

BJP workers protest in Sambhajinagar : महापालिका निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. माजी मंत्री भागवत कराड यांची कार आडवून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Namdeo Kumbhar

महापालिका निवडणुकीतील तिकिट न मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी माजी मंत्री भागवत कराड यांची कार आडवली. त्यांचा फोटोवर काळे फासले. काही काळ कार कार्यकर्त्यांनी रोखली. संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा आक्रोशाने महाराष्ट्राचे राजकारण कुठे गेलेय? याची चर्चा सुरू झाली. आम्ही भाजपसाठी जिवाचे रान केले, पण आम्हाला तिकिट मिळाले नाही. उपऱ्यांना तिकिट दिले, आम्हाला दिले नाही... असे कार्यकर्ते म्हणाले. संभाजीनगरमध्ये हाय हाय चा नारा कार्यकर्त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकिट न मिळाल्याने काही पदाधिकाऱ्यांकडून उपोषण करण्यात येत आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भागवत कराड निघाले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या गाडीला रस्त्यावरच घेराव घालून नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घेरावामुळे पुढील राजकीय हालचाली कशा असतील, हे आता पाहण्यासारखे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT