BJP leaders celebrate after securing President and Vice President posts in Satara Zilla Parishad amid high political drama. Saam Tv
Video

साताऱ्यात भाजपनं बाजी फिरवली, ZP चं अध्यक्ष अन् उपाध्यपद मिळवलं; शिंदेसेना अन् राष्ट्रवादीचे सदस्य फोडले|VIDEO

BJP Wins Satara Zilla Parishad President Election 2026: सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षात भाजपने मोठा विजय मिळवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर कब्जा केला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का बसला असून मतदानावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Omkar Sonawane

जिल्हा परिषद सत्तासंघर्षात भाजपने आपली ताकद दाखवत सातारा जिल्हा परिषदेवर झेंडा रोवला आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे आपल्या ताब्यात घेतली. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी, तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना अपेक्षित संख्याबळ दाखवण्यात अपयश आले.

या विजयामागे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची रणनीती महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे. तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना धक्का देत भाजपने साताऱ्यात सत्ता काबीज केली. दरम्यान, मतदान प्रक्रियेदरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सदस्य आत प्रवेश करत असताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या गोंधळात शंभूराजे देसाई जखमी झाल्याची चर्चा असून, तत्काळ वैद्यकीय पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. संपूर्ण घटनेमुळे सातारा जिल्हा परिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Rupee: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर, भारतात महागाई वाढणार?

Maharashtra Live News Update: शिर्डीत कॅप्टन अशोक खरात याच्या पत्नीच्या नावे आणखी एक मालमत्ता

Walking Tips: दररोज चालता? पण स्लो वॉकिंग पुरेसं नाही! तज्ज्ञांनी सांगितली योग्य चालण्याची पद्धत

Pune : पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला; नेमकं काय प्रकरण?

Pan Aadhaar Link : ... तर तुमचं पॅन कार्ड होणार बंद, हे काम आताच करा

SCROLL FOR NEXT