BJP will contest 18 seat in Mumbai saam tv
Video

Maharashtra Election : मुंबईतील या १८ जागांवर भाजप लढणार?

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून, भाजप मुंबईतील १८ जागांवर लढणार असल्याची माहिती समजते.

Nandkumar Joshi

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि राजकीय रणांगणावर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आणि दुसरीकडे दररोज कुठे न कुठे, कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षात नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे 'आपटीबॉम्ब' फुटत आहेत. महाविकास आघाडी, तसेच महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चेचा सिलसिला सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली तरी, अद्याप महाआघाडी आणि युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. ही चर्चा अद्याप अंतिम टप्प्यातच आहे. महायुतीच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झालं नसलं तरी, तो निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार, भाजप १५३, शिंदे गट ८० आणि अजित पवार गट ५५ जागा लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप मुंबईत १८ जागा लढण्याची शक्यता आहे. १४ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. अद्याप ४ जागांवर चर्चा करायची आहे.

बोरीवली, दहीसर, कांदीवली पूर्व, चारकोप, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुलुंड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पश्चिम, सायन कोळीवाडा, वडाळा, मलबार हिल, कुलाबा, कलिना, मालाड पश्चिम या १८ जागांवर भाजप निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT