Sanjay Raut SaamTv
Video

Maharashtra Politics: पाच खासदार फोडा, एक मंत्रिपद मिळवा; भाजपची अजित पवार यांना ऑफर, संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut On Ajit Pawar : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.. त्यातच शरद पवारांचे 5 खासदार फोडले तरच अजित पवारांच्या पक्षाचा 6 खासदारांसह कोटा पूर्ण होऊन त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. मात्र राऊतांचा हा दावा मित्र पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फेटाळला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवलीय.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली.. त्यातच पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अस्वस्थ असल्याचं विधान बावनकुळेंनी केलं होतं. तर अजित पवारांनी आपल्या नेत्यांसह वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवारांनी अमित शाहांचीही भेट घेतल्याने या चर्चांना आणखीच हवा मिळाली..मात्र खरंच अजित पवार शरद पवारांचे खासदार फोडणार की राऊतांचा दावा हवेत विरणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT