bjp MLA beaten  Saam tv
Video

संत महाराजाचा आशीर्वाद घ्यायल्या गेलेल्या भाजप आमदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

bjp MLA beaten : संत महाराजाचा आशीर्वाद घ्यायल्या गेलेल्या भाजप आमदाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशमधील एका भाजप आमदाराला एका संत सीताराम बाबा महाराजाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.सेवडा येथील भाजप आमदार संत सीताराम महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेले. यावेळी संत महाराजांनी रागाच्या गळ्यात घातलेली माळ काढून भाजप आमदाराला मारहाण केली. संत महाराज रागाच्या भरात काही बोलतानाही दिसले.

मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील बेरछा येथील भिंड जिल्ह्यातील निसरोल मंदिर आश्रमातील महंत सीताराम महाराज यांची कथा सुरू होती. त्यावेळी सेवडा येथील भाजप आमदार प्रदीप अग्रवाल आशीर्वाद घ्यायला मंचावर गेले. त्यांनी संत सीताराम बाबा यांच्या गळ्यात माळ घातली. परंतु काही क्षणात मंचावरील वातावरण बदललं. महाराजांनी थेट भाजप आमदाराला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भागवत कथा सुरू असताना संत सीताराम महाराज यांनी मारहाण केली. संतापलेल्या महाराजांनी भाजप आमदाराला चक्क बुक्के मारत दूर ढकललं. भाजप आमदारांनी आणलेली फुलांची माळही फेकून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT