BJP Leader Pravin Darekar Rescued After Being Stuck in Lift During Vasai Event Panic at the Venue Saam Tv
Video

भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले अन्...; वसईतल्या कार्यक्रमात थरारक प्रसंग|VIDEO

Pravin Darekar Elevator Incident Vasai: वसईमध्ये आयोजित शिबिरादरम्यान भाजप आमदार प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले. तब्बल १५-२० मिनिटांनी त्यांची सुटका झाली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला असून सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Omkar Sonawane

वसई पश्चिमेकडील बाभोळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिरादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. भाजपचे नेते तथा आमदार प्रवीण दरेकर हे या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी आले असता लिफ्टमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडले. ही घटना वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात घडली. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दरेकर लिफ्टने वर जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेही लिफ्टमध्ये होते.

सुमारे पंधरा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्थेबाबत आणि लिफ्टच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. खुद्द आमदार अडकले असतानाही जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा सवाल आता उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT