Sandeep Gidde-Patil announcing his stand as BJP’s internal conflict intensifies in Tasgaon. Saam Tv
Video

Maharashtra Politics: भाजपमध्ये भूकंप! ऐन निवडणुकीत उभी फूट|VIDEO

Internal Power Struggle May Cost BJP In Tasgaon: तासगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली असून संदीप गिड्डे पाटील आणि तालुका अध्यक्षांमध्ये संघर्ष उफाळला आहे.

Omkar Sonawane

सांगली येथील तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली असून पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. भाजपचे नेते संदीप-गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. निवडणुकीत प्रक्रियेमध्ये भाजप तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फाट्यावर मारत मत विभागणीचे भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आघाडी करण्याच्या सूचना असताना देखील भाजप तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी मनमानी कारभार करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. तसेच आपल्या उमेदवारांना देखील डावलण्यात आल आहे असा आरोप देखील संदीप गिड्डे-पाटील यांनी केला आहे.

त्याचबरोबर स्थानिक भाजपने निवडणूक प्रचारापासून आपल्याला लांब ठेवलं आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि संजयकाकांच्या स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची भूमिका संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये संदीप गिड्डे पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपाला या अंतर्गत संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Processed Food Side Effect: जास्त प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: एकाच व्यासपीठावर दोन पिक्चर, भाजप आणि शिवसेनेची एकाच मंचावर सभा

SCROLL FOR NEXT