BJP Vidhansabha News SaamTv
Video

Maharashtra Politics : महायुतीत २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत?

Saam Tv

आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना राज्यातील भाजप नेत्यानी त्यांच्याकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत १५० जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यात संख्याबळानुसार महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच भाजपने हा प्रस्ताव दिला असल्याचं समजत आहे. महायुतीत २ पक्षांना हव्या असलेल्या किमान २५ जागांची बरोबरी आहे. अमरावती, इंदापूरसारख्या मतदारसंघातील जागांचा तिढा सुटणं अशक्य आहे. त्यामुळे अशा २५ मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या चर्चेचं खंडन केलं आहे. ''असं काहीही नाही, या सगळ्या थापा आहेत. आम्ही सगळे बसून २८८ जागा कोणकोणत्या पक्षाला द्यायच्या हे ठरवणार आहे. जेव्हा आमचं ठरेल तेव्हा आम्ही सांगू.'' अशा प्रकारचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी या प्रकरणी बोलताना दिलं आहे. त्यामुळे या २५ जागांचा तिढा वाढेल की सुटेल हे येणाऱ्या काळात बघणं महत्वाच ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

SCROLL FOR NEXT