Bihar CM Nitish Kumar launching the Ladki Bahin Yojana, transferring ₹10,000 to women’s bank accounts Saam Tv
Video

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Nitish Kumar Government Transfers First Installment: बिहार सरकारनं दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 75 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट 10 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्यानंतर आता बिहार सरकारनं महिलांसाठी अशीच एक योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असे या योजनेचे नाव असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा हेतु असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता आज 26 सप्टेंबर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

1 कोटी 11 लाख महिलांनी केला अर्ज

या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 11 लाख महिलांनी अर्ज केलाय. पात्र ठरलेल्या 75 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुर केली होती. यामुळे विधानसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकला. आता बिहारमध्ये देखील काही दिवसांनी मतदान होणार असून नितीश कुमार सरकारला याचा कितपत फायदा होतो पाहणे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT