UPI  Saam Tv
Video

UPI व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता ३ हजारांपेक्षा अधिकच्या व्यवहारांवर शुल्क?

UPI Payment: यूपीआय व्यवहार करण्यासाठी आता जास्त पैसे लागणार आहे. ३ हजारांपेक्षा जास्त पेमेंटसाठी आता शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.

Priya More

तुम्ही UPI द्वारे व्यवहार करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ३ हजारांहून अधिकच्या व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. कोविड संकटानंतर भारतात यूपीआय व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली. सध्या यूपीआयवर होणाऱ्या मर्चंट व्यवहारांचं एकूण मूल्य ६० लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मात्र झिरो MDR पॉलिसीमुळे बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना खर्च भागवणं कठीण झालं आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक होण्याचे प्रमाण कमी झालं आहे. म्हणूनच यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याची शक्यता आहे. PMO, अर्थ मंत्रालय आणि संबंधित विभागांनी यावर चर्चा सुरू केली. बँका, फिनटेक कंपन्या आणि NPCI यांच्यासोबत सल्लामसलत झाली आहे. पुढील १ ते २ महिन्यांत यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही होणार फायदा; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

SCROLL FOR NEXT