OBC bahujan Aghadi Party In ZP Election saam tv
Video

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकांच्या आखाड्यात नव्या पक्षाची एन्ट्री, मागेल त्याला तिकीट अन् घरपोच एबी फॉर्म

ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष या निवडणुका लढणार आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ही घोषणा केली.

Nandkumar Joshi

महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात २९ महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, राज्याच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एन्ट्री झाली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नवा पक्ष रणांगणात उतरला आहे. ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष निवडणुका लढणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका या पक्षाच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत, अशी घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष कार्यकर्त्यांना त्यांचं राजकीय व्यासपीठ देणार आहे. कार्यकर्त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. ज्यांना तिकीट हवं असेल तर त्यांनी तात्काळ संपर्क साधावा. त्यांना एबी फॉर्म घरपोच पोहोचवण्याचं काम केलं जाईल, असे शेंडगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

मुंबईत महापौरपदासाठी शिंदेंची फिल्डिंग? शिंदेंना हवंय मुंबईचं महापौरपद?

Maharashtra Live News Update: पेण खोपोली मार्गावरील एचपी इंटरनॅशनल कंपनीत भीषण आग

SCROLL FOR NEXT