Operation Sindoor Air Strike Saam TV
Video

Operation Sindoor: एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला मोठा धक्का, पाकिस्तानचं F16 विमान काश्मीरमध्ये कोसळलं

Operation Sindoor Air Strike: भारत-पाकिस्तान संघर्षाच्या दरम्यान, भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कारवाईत पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान पाडण्यात आले आहे.

Dhanshri Shintre

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी तळांवर मध्यरात्री टार्गेटेड स्ट्राइक करण्यात आले, ज्याने दहशतवादी संरचनांचे मोठे नुकसान केले.

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानचे धोकादायक एफ-16 लढाऊ विमान पाडले आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानची दोन अत्याधुनिक लढाऊ विमाने, एफ-१६ आणि जेएफ-१७, आकाशातच पाडली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ही ठोस कारवाई केली, ज्यात २६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर पूर्ण लक्ष ठेवले आणि पल-पलच्या घडामोडींची माहिती घेतली. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरीदके, मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट येथील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

SCROLL FOR NEXT