NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी CBI कडून FIR दाखल करण्यात आली होती. पेपर फुटीप्रकरणी आता 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी लातूर मधून दोन जिल्हापरिषद शिक्षकांना अटक करण्यात आली होती. चौकशीनंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं होतं. परंतु संशयित शिक्षकांना पुन्हा एकदा एटीएस कडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी नविन चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयित शिक्षकांपैकी एक पोलिसांच्या ताब्यात असून दुसरा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.