Santosh Deshmukh Case Protest SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपींना फाशी द्या, मुंबईत आंदोलकांची मागणी | VIDEO

Protest In Mumbai : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

Saam Tv

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानदरम्यान जनआक्रोश मोर्चा निघाला आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरोपंच संतोष देशमुख यांची दीड महिन्यापूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहे. देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासाठी देखील यापूर्वी संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात प्रशासनाने स्पेशल एसआयटी स्थापन केली असून सीआयडी आणि एसआयटीकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. सध्या ७ आरोपींना पोलिसांनी तब्यात घेतलं असून आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. या संपूर्ण प्रकरणात तपास वेगाने करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी राज्यात सर्वत्र मोर्चे काढण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत देखील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात देशमुख कुटुंबियांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख हे देखील या मोर्चात सहभागी झालेले बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT