Walmik Karad Surrender Saam Tv
Video

Walmik Karad : जामीनासाठी धडपडणाऱ्या वाल्मिक कराडची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, काय आहे कारण? पाहा Video

Kej Court : बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Saam Tv

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात खंडणी प्रकरणातील मकोका लागला आरोपी वाल्मिक कराड याची जामीन मिळावा म्हणून धडपड सुरू आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर केजच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र कराडच्या वकीलांनी मागणी केल्यानंतर आता या अर्जावर २३ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याची सध्या चौकशी सुरू असून तो कोठडीत आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराडने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती. त्यामुळे केजच्या सत्र न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लसख होतं. सीआयडीने त्याच्या या जामीन अर्जावर आक्षेप घेतला असून या प्रकरणाच्या अधिकच्या चौकशीसाठी त्याला कोठडीत ठेवण्याची मागणी केली आहे. त्याच्यावर या प्रकरणी मकोका देखील लावण्यात आलेला आहे. दरम्यान, या अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती वाल्मिक कराडच्या वकीलांनी केली होती. त्यामुळे आता ही विनंती मान्य करून न्यायालयाने याबद्दलची सुनावणी २३ जानेवारीला ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Liquor Ban : सलग ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

Bank Scam: SBI च्या ग्राहकांनो सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय? सेकंदातच होईल अकाऊंट रिकामं

SCROLL FOR NEXT