Video

Pankaja Munde News Today: मराठा आंदोलक तरुणांची पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी!

Pankaja Munde News: पंकजा मुंडे प्रचाराच्या अनुषंगाने गावात येताच, मराठा आंदोलक तरुणांनी, "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणा दिल्या.

Saam TV News

बीड : महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रचाराच्या अनुषंगाने गावात येताच, मराठा आंदोलक तरुणांनी, "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणा दिल्या. हा प्रकार बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या लवूळ गावामध्ये घडला. तर या अगोदरही पंकजा मुंडे या केज तालुक्यातील पावनधाम येथे, संत तुकाराम बीज उत्सवानिमित्त गेल्या असता, त्या ठिकाणी देखील पंकजा मुंडे यांचा ताफा आडवत घोषणाबाजी करण्यात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे. पंकजा मुंडे यांना भाजपच्या वतीने बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रचारादरम्यान मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणवासियांच्या प्रवासात खड्ड्यांचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गांवर वाहतूक कोंडी

गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT