Bajrang Sonwane SaamTv
Video

Bajarang Sonwane : वाल्मिक कराड यांच्या बायकोने केलेल्या आरोपावर बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले | VIDEO

Walmik Karad News : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषद घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसच वाल्मिक कराड याच्या बायकोने केलेल्या आरोपांवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.

Saam Tv

संतोष देशमुख प्रकरणी अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती? त्यांनानंतर राहायला घर कोणी दिलं? या सगळ्या गोष्टी तपासात येईल. त्यातून खंडणीमधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात, कोणी गाड्या पुरवल्या हे सगळं समोर येईल, असं बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहे.

पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केज मध्ये गुंडांची प्रवृत्ती झालीय. इतर आरोपींनासुद्धा मोकका लावला पाहिजे ही आमची मागणी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवायला हवं, उज्वल निकम जर होकार देत नसतील तर सतीश माने-शिंदे या वकील महोदयांना हे प्रकरण द्या. धस काय म्हणतात हे मला नाही माहिती. कालपासून बीडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू आहेत. हे असताना आंदोलन कसं झालं? गुंड प्रवृत्तीचे लोकांनी परळी बंद करण्याचा निर्णय घेतला. १०० टक्के मी अमित शाह यांची भेट घेतली होती. मी त्यांना सगळे वृत्तान्त देणार आहे. मी जर वाल्मीक कराड यांना धमकी दिली, तर मग एवढे दिवस का लागले बोलायला. गुंड राज होतं, आमच्या लोकांना मारायचा प्लॅन होतो. अशा गुंडांना आम्ही कशी धमकी देणार? गुन्हेगाराला कुठली ही जात नसते, काही मूठभर समाज कंटक आहेत ज्यांना जातीय रंग द्यायचा आहे. अजित पवारांनी बीडमध्ये पक्षाची कारवाई करताना थोडा उशीर केला का काय असं वाटतंय, संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात जे कोणी सामील असेल या सर्वांना फाशी झाली पाहिजे. मी मागितला तर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का? सरकारचा प्रश्न आहे ते बघतील, असंही बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

Rapido Viral Video: रॅपिडोचालकाचं अश्लील कृत्य! बाईकवर बसलेल्या महिलेला केला स्पर्श; VIDEO शेअर करत म्हणाली...

Sunday Horoscope: या राशीच्या बॅंक बॅलेन्समध्ये वाढ होईल, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Navi Mumbai Tourism : नवी मुंबईतील 'हे' मनमोहक ठिकाण थंडीत बेस्ट वीकेंड डेस्टिनेशन

व्हीव्हीपॅट पावत्यांचा रस्त्याच्या कडेला ढीग; दोन अधिकारी निलंबित, आयोगाकडूनही स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT