Beed’s Manjarsumba Chowk witnessed tense moments as Maratha and OBC groups clashed over Valmik Karad support. Saam Tv
Video

Beed News: बीडमध्ये दोन गट आमने-सामने; एका गटाकडून वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी|VIDEO

Santosh Deshmukh Case Accused Support In Beed: बीडमधील मांजरसुंबा चौकात दोन गट आमने-सामने आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

Omkar Sonawane

बीड: मांजरसुंबा चौकात आज दोन गट आमने-सामने आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी “वाल्मीक अण्णा अंगार है, बाकी सब भंगार है, वाल्मीक अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावर दुसऱ्या गटाने जोरदार प्रत्युत्तर देत घोषणाबाजी सुरू केली. काही काळ रस्त्यावरच दोन्ही समाज बांधवांमध्ये घोषणाबाजीच्या माध्यमातून तणाव वाढला. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने वाद आणखी चिघळण्याआधीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण शांत झाले. परंतु घोषणाबाजीमुळे मांजरसुंबा परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT