Manasvi Choudhary
पावसाला सुरूवात झाली की बाहेर जाऊन धावणे, चालणे किंवा जिममध्ये जाणे अनेकदा कठीण होते. अशा वेळी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी योगासने करणे महत्वाचे आहे.
पावसाळ्याच्या दिवसात अनेक गंभीर आजार डोकं वर काढतात अशावेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे 5 योगासने करा.
कपालभाती हा व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते. पावसाच्या दिवसांत कपालभाती केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
अधो मुख श्वानासन केल्याने पाठीचा कणा आणि छातीचे स्नायू बळकट होतात. या योगासनामुळे पाठीचा आणि पोटाचा व्यायाम होतो, डोक्याकडील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
भुजंगासन केल्याने पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो, ज्यामुळे पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. वजनही जलदगतीने घटते.
मत्स्स्यासन या योगासनामुळे स्नायू लवचिक होतात यामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. ताण तणाव देखील कमी होण्यास मदत होते.
सर्वांगासन हा योगासन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. या योगासनामध्ये संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर असतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.