बीडच्या उमा किरण क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी बीड शहरातील नामांकित क्लासेसच्या दोन प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध काद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रा. विजय पवार आणि प्रा. प्रशांत खटावकर असे गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावे आहेत.१७ वर्षीय पीडिता ही बीड येथील एका नामांकित खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
जुलै २०२४ मध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खटावकर याने तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने ही बाब क्लासचे संचालक प्रा. विजय पवार यांना सांगितली व त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र पवार यांनी खटावकर याला आळा घालण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले. मे २०२५ पर्यंत हा प्रकार सुरु होता.
गुरूवारी पीडीतेने दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. तपास पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत.
फिर्यादीमध्ये पीडितेने काय म्हंटले आहे
मला प्रशांत खाटोकर सर हे कॅबिनमध्ये एकटीला बोलावून माझा किस घ्यायचे. माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावायचे ते असे माझ्यासोबत वारंवार करत असत आणि मला धमकी द्यायचे की जर तू कोणाला सांगितले तर तुला मारून टाकील त्यानंतर मी विजय पवार सर यांना सांगितले तेव्हा ते मला म्हणाले की, त्यांना आम्हीच ठेवले आहे मुलींना त्रास देण्यासाठी असे म्हणून ते पण माझ्यासोबत वाईट वागायला लागले आणि कॅबिनमध्ये बोलावून ते पण छातीला हात लावायचे आणि गुप्त अंगाला हात लवायचे असे फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.