Students and professors run for safety after a sudden bee swarm disrupted the Shiv Jayanti procession at Dr. PDKV Akola. Saam Tv
Video

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Bee Attack During Shiv Jayanti Procession In Akola: अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.

Omkar Sonawane

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ आणि धावपळ उडाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीची तयारी सुरू असताना परिसरातील झाडावर असलेले मधमाशांचे पोळे हलले. पोळे हलताच मधमाशा आक्रमक झाल्या आणि जवळ उभ्या असलेल्या काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर त्यांनी हल्ला केला.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पळत सुटले. या घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धूर (स्मोक बॉम्ब) सोडण्यात आला. मात्र धुरामुळे मधमाशा अधिकच पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख हे देखील उपस्थित होते. त्यांनी आणि इतरांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव केला. नंतर परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

Pakistan Blast: पाकिस्तानातील इमारतीत भीषण स्फोट; १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

Maharashtra Live News Update : . नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Health Care : ऊसाचा रस पिणे ठरेल 'या' लोकांसाठी घातक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT