Balasaheb Thorat News: लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढील बटण दाबावं लागेल याचा अर्थ असा यांना बहीण लाडकी नाही, सत्ता लाडकी आहे. लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे, जनता हे सगळं ओळखून आहे. याचबरोबर बाळासाहेब थोरात जागा वाटपासंदर्भात देखील बोललेत. आम्ही दोन दिवसांपूर्वी बसलो होतो काही चर्चा केल्या आहेत. प्रामुख्याने निकष कसे असावे, काय असावे प्राथमिक चर्चा आम्ही केली आहे. त्या पद्धतीने पुढच्या बैठकीत आम्ही आणखी बारकाईने चर्चा करू, जागा निश्चिती होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढू, त्यामध्ये मित्र पक्षांचा सहभाग असेल आणि आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणूक मोठ्या मताधिक्यांने जिंकू असंही बाळासाहेब थोरात म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.